Special Reports Ranjeet Kasle On Walmik Karad | वाल्मिक कराडचं एन्काऊंटर करण्यासाठी पोलिसाला ऑफर?
Special Reports Ranjeet Kasle On Walmik Karad | वाल्मिक कराडचं एन्काऊंटर करण्यासाठी पोलिसाला ऑफर?
बीडमधील सायबर विभागाचे निलंबित पीएसआय सध्या चर्चेत आहेत.. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला कोट्यवधीची ऑफर होती हा त्यांचा ताजा दावा आहे. धनंजय मुंडेपासून ते मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आणि बीड पोलिसांपासून ते आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर आरोप करुन झाले आहेत.
काय आहे गौडबंगाल पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून...
वाल्मिक कराडचं एन्काऊंटर करण्यासाठी सुपारी दिल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला.. त्यासाठी एका निलंबित पीएसआयला कोट्यवधींची सुपारी, ऑफर दिली गेली.. आणि हा दावा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून स्वत: तो पोलिस अधिकारीच आहे. रणजित कासले असं या पोलिस उपनिरीक्षकाचं नाव आहे. गेले दोन आठवडे निलंबन झाल्यापासून ते सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतायत. त्यात मोठे मोठ्या नेत्यांची, अधिकाऱ्यांची नावं घेत गंभीर स्वरुपाचे आरोप करतायत. काल त्यांनी असाच नवा सनसनाटी आरोप केलाय.
बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते - सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले होते - तिथे आरोपींसोबत पैशांचे व्यवहार करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले - त्या प्रकरणी त्यांना आणि त्यांच्या दोन सहकारी पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. - तेव्हापासून ते सोशल मीडियावर आरोपांचे व्हिडिओ टाकत आहेत - आत्महत्या करण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता - विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या पैशांच्या गाड्या पकडल्या असा आरोप ते करतात - ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमजवळील त्यांची ड्युटी बदलली असाही आरोप त्यांनी केला होता. - स्ट्राँगरूममधील मतपेट्यांची अदलाबदल करण्यात आली आणि पैशांची देवाणघेवाणही कऱण्यात आली असाही त्यांचा आरोप आहे - त्याच काळात एका निनावी खात्यातून त्यांच्या खात्यात १० लाख रूपये अचानक डिपॉझिट झाल्याचा दावा - वाल्मिक कराडने विधानसभा निवडणुकांदरम्यान परळी मतदारसंघात पैसे पुरवले असाही दावा - वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा करणारे फोटो कराडच्या मुंबईतील बीकेसीमधील आलिशान कार्यालयाचे असल्याचा दावाही त्यांनी केला - मनोज जरांगेशी संबंध असल्यामुळे त्रास दिला जातो असा दावाही ते करतात - मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.